Advertisement

तहसिलदारांच्या पथकावर वाळु माफियांचा हल्ला

प्रजापत्र | Friday, 20/11/2020
बातमी शेअर करा

बीडः जिल्ह्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून वाळु माफियांची मुजोरी सुरुच असुन गुरुवारी रात्री उशीरा गेवराई तालुक्यातील बोरगाव शिवारात वाळु माफियांनी चक्क तहसिलदारांच्या पथकालाच मारहाण केली. यात तलाठयासह काही कर्मचारी जखमी झाले आहेत.
बीड जिल्ह्यात वाळु माफियांची मुजोरी सुरुच असून महसुल आणि पोलिसांच्या आशिर्वादाने पोसलेली वाळु माफियागिरी आता महसुलवरच उलटली आहे. याचा प्रत्यय गुरुवारी आला. गुरुवारी रात्री गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे आपल्या पथकासह तालुक्यातील बोरगाव शिवारात गेले असता, नगर जिल्ह्यातील वाळु माफियांनी या पथकावर हल्ला करुन पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात काही जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Advertisement

Advertisement