गेमिंग कंपन्यांकडून जीएसटी (GST News) चोरी होत असल्याचा मुद्दा गेल्या काही काळापासून सरकारच्या रडारवर होता. आता याचप्रकरणी सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची कर अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister Pankaj Chaudhari News) यांनी लोकसभेत (Loksabha Updates) सांगितले आहे. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जीएसटी चोरी (GST in India) प्रकरणी सध्या याची चौकशी करण्यात येते आहे.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात पंकज चौधरी यांनी अंमलबजावणी संचालनालयाने सायबर आणि क्रिप्टो मालमत्तेच्या फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुन्ह्यांची रक्कम जोडली आहे ज्यात ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) इत्यादींचा वापर करून पैसे उकळण्यासाठी वापरले गेले आहेत ही बाब समोर आल्याचे म्हटलं आहे.
काही गेमिंग कंपन्यांच्या (ऑनलाइन गेमिंग कंपन्यांसह) चौकशी सुरू
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) भारतात तसेच परदेशात असलेल्या काही गेमिंग कंपन्यांच्या (ऑनलाइन गेमिंग कंपन्यांसह) चौकशी सुरू केली आहे. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत या कंपन्यांनी जीएसटीची अंदाजे 22,936 कोटी रुपयांची चोरी केल्याचं म्हटलं आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालय सायबर आणि क्रिप्टो मालमत्तेच्या फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी करत आहे ज्यामध्ये ऑनलाइन गेमिंग इत्यादींचा वापर करून पैसे उकळण्यासाठी वापरले गेले आहेत.