बीडः येळंबघाट नजीक आपल्या प्रेयसीवर अँसिड आणि पेट्रोल टाकून तिला जाळणाऱ्या अविनाश राजुरे या नराधम प्रियकराला बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी दिवाळीच्या दिवशीच येळंबघाट नजीक एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी आढळली होती. तिला तिचा प्रियकर अविनाश राजुरेनेच जाळल्याचे तिच्या जवाबातून समोर आल्यानंतर देगलुर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल असलेल्या नेकनुर पोलीसांच्या ताब्यात दिले. दरम्यान रविवारी सदर तरुणीचे निधन झाले. आरोपी अविनाशला सोमवारी बीडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कदिर अहेमद न. सरवरी यांच्यासमोर उभे केले उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी आरोपीला दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने आरोपीला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
बातमी शेअर करा