Advertisement

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची भाऊबीज महिला व बालविकास विभागाकडून जीआर जारी

प्रजापत्र | Friday, 13/11/2020
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्रपुरस्कृत योजनेअंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सरकारने दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. सरकारच्या निर्णयाचा २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना लाभ होणार आहे.

महिला व बालविकास विभागाने आज यासाठीचा शासन निर्णय जारी करून अंगणवाडी सेविकांना २ हजार रुपयांप्रमाणे भेट देण्यासाठी निर्णय जाहीर केला आहे. यासाठी सरकारकडून ३८ कोटी ६० लाख ८४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात मागील सात महिन्यांपासून त्यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी राज्य सरकारकडून सोपवण्यात आली यादरम्यान, दिवाळीची भाऊबीज भेट सरकारकडून लवकरच जाहीर केली जावी, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने भाऊबीजपेक्षा अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करायला हवी होती, अशी अपेक्षा अंगणवाडी संघटनांनी केली आहे.

Advertisement

Advertisement