उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजणक असून उपचारासाठी त्यांना उत्तर प्रदेशमधील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर नरेश त्रेहान हे मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
मुलायमसिंह यादव हे सध्या 82 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत आहे. प्रकृती ठिक नसल्याने जूनमध्ये त्यांना उत्तर प्रदेशमधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यार हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये उपचार सुरू होते.परंतु, आज दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तपासणीत त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाल्याचे आढळून आले.