बीड-कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई बळवंतराव कदम यांचे रविवारी (दि.८) सकाळी ११.३० च्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७८ वर्षांच्या होत्या.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष बळवंतरावजी कदम यांच्या राजकीय,सामाजिक कार्यात त्यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पश्चात एक मुलगा सभापती दिनकरराव, आणि दोन मुली, जावयी, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ४.०० वा. भगवान बाबा प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दरम्यान कदम परिवाराच्या दुःखात दैनिक प्रजापत्र परिवार सहभागी आहे.
बातमी शेअर करा