Advertisement

राहुल द्रविडचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

प्रजापत्र | Sunday, 28/08/2022
बातमी शेअर करा

India vs Pakistan T20 Live Score, 28 August 2022 : आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहे. दरम्यान, आज संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर होणार आहे. तसेच डिझ्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

Advertisement

Advertisement