मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात चक्कर आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देशमुख प्रकृती खालावल्याने कोसळल्याचे समजते . त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तुरुंग अधिकारी यांनी दिली.
अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीत गृहमंत्री पद भूषवलेले आहे. 10 महिन्यांपूर्वी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने याबाबत चौकशी केली होती. कधीकाळी मोठा रुबाब असलेल्या मंत्री राहिलेल्या देशमुखांची आत्ताची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जेलमध्ये त्यांची प्रकृती पूर्णपणे खंगली असून, डोक्यावरचे केस पांढरे झाल्याने त्यांना ओळखणेही कठिण झाले आहे.