अदानी समूह NDTV मीडिया समूहातील 29.18% हिस्सा विकत घेणार आहे. हा करार अदानी समूहाची कंपनी एएमजी मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून होणार आहे. AMG मीडिया नेटवर्क लिमिटेड (AMNL) ची उपकंपनी VPCL मार्फत हे अधिग्रहण केले जाईल. अदानी मीडिया नेटवर्कचे सीईओ संजय पुगलिया यांनी एक पत्र जारी करून ही माहिती दिली.
अदानी समूहाच्या एएमजी मीडियाने एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त 26% स्टेक ऑफर केला आहे. अदानी समूहाने NDTV मधील 26% स्टेकसाठी 294 रुपये प्रति शेअर दराने 493 कोटी रुपयांची खुली ऑफर दिली आहे. यानंतर मंगळवारी NDTV चे शेअर 5% वाढून 376.55 रुपयांवर बंद झाले.
अदानी ग्रुपचा एक भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ने AMG मीडिया नेटवर्कसह मीडिया उद्योगात प्रवेश केला आहे. अदानी समूहाने 26 एप्रिल 2022 रोजी AMG मीडिया नेटवर्क लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. यामध्ये माध्यम व्यवसाय चालविण्यासाठी एक लाख रुपयांचे प्रारंभिक अधिकृत आणि भरलेले भागभांडवल प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये प्रकाशन, जाहिरात, प्रसारण यासह माध्यमांशी संबंधित कामांचा समावेश केला जाणार आहे.
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 8 लाख कोटी रुपये आहे
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सध्या सुमारे 8 लाख कोटी रुपये आहे. अलीकडेच, अदानी समूहाने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सिमकडून अंबुजा आणि एसीसी सिमेंट कंपन्यांचे भागभांडवल सुमारे 81 हजार कोटी रुपयांना विकत घेतले होते.
अदानी ग्रुपने मागच्या वर्षभरात 32 मोठे सौदे केले
प्रदीर्घ काळ कोळसा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अदानी समूह आता राइस ब्रँडपासून ट्रॅव्हल पोर्टल्स, मीडिया समूह, ग्रीन एनर्जी आणि सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या व्यवसायात विविधता आणत आहे. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात, समूहाने 1.31 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 32 हून अधिक सौदे केले आहेत, ज्यामुळे ते आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यवहार गटांपैकी एक बनले आहे.
कंपनी डील व्हॅल्यू (कोटी रुपयांत)
ACC 81,000
एसबी एनर्जी 27,121
ओशन स्पार्कल 1,688
सद्भाव इन्फ्रा 1,665
गंगावरम पोर्ट 1,944
वरोरा-कुरनूल ट्रान्सपोर्ट 3,355
स्टर्लिंग अँड विल्सन 441
द क्विंटचे संपादकीय संचालक असलेले संजय पुगलिया यांची अदानी एंटरप्रायझेसच्या माध्यम उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य संपादक म्हणून निवड झाल्यानंतर अदानी समूहाच्या NDTV च्या अधिग्रहणाबाबत चर्चा सुरू झाली होती. अदानी मीडिया नेटवर्कचे सीईओ संजय पुगलिया यांनी एक पत्र जारी केले की एनडीटीव्ही हे भारतातील तीन सर्वात मोठ्या चॅनेलपैकी एक आहे, जे टीव्ही तसेच सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.