पत्राचाळ प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपली. यानंतर त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊतांचा मुक्काम सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. गेल्या 22 दिवसांपासून ते तुरुंगात आहेत.
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीने 30 जुलै रोजी संजय राउत यांना अटक केली होती. यानंतर 8 ऑगस्ट रोजी न्यायालयाने संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी ईडीची चौकशी सुरू असल्याने ईडीकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली.यावर कोर्टाने त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बातमी शेअर करा