गेल्या आठवड्यात राज्याला झोडपणाऱ्या पावसानं आता थोडी उसंत घेतली असली तरी काही ठिकाणी धरणक्षेत्रात मात्र पाऊस सुरूच आहे... औरंगाबादच्या जायकवाडी धरण क्षेत्रात आणि नाशिक, गंगापूर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे... परिणामी जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 4 फुटांनी उघडण्यात आले... सध्या जायकवाडीतून ७२ हजार ४७८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. अवघ्या 24 दिवसांत जायकवाडीतून तब्बल 31 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे.
बातमी शेअर करा