पेट्रोल,डिझेल, वीज, भाजीपाल्यापाठोपाठ आता डाळी आणि कडधान्यांच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे साधा वरणभात करताना ही गृहिणींना विचार करावा लागणार आहे. उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC)घाऊक बाजारात तूरडाळ (Tur dal Rate) थेट 115 रुपये किलो झाली आहे. तर किरकोळ बाजारात या किंमतीत 10 ते 20 रुपयांची वाढ झाली असून ग्राहकांना आता एक किलो तुरीसाठी 125 ते 135 रुपये मोजावे लागणार आहे. पावसाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पीके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भाजीपाला आधीच महाग झाला आहे. तर आता डाळी ही महाग (expensive)झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या दरवाढीमुळे किचन बजेट (Kitchen Budget) मात्र कोलमडून जाणार आहे.
बातमी शेअर करा