Advertisement

राजधानीत दिल्लीमध्ये पुन्हा मास्कसक्ती

प्रजापत्र | Thursday, 11/08/2022
बातमी शेअर करा

दिल्लीत (Delhi News) वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या (India Corona News) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. मास्क घातला नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. ल्लीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. मास्क घातला (Mask Compulsory) नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. दिल्लीमधील अरविंद केजरीवाल सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कारमधून प्रवास कऱणाऱ्या लोकांना मास्क बंधनकारक नसेल. कारमधून विना मास्क लोक प्रवास करु शकतात. पण सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे.
 

Advertisement

Advertisement