यवतमाळ : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूती (Yavatmal Pregnant Lady) कळा सुरु झाल्या. त्यामुळे सरद महिलेला ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं. पण या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून (Rural Hospital) चक्क परत पाठवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून परत का पाठवलं, याचं कारणही अत्यंत संतापजनक असल्याचा आरोपा करण्यात आला आहे. आधार कार्ड नाही म्हणून या महिलेला ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्यांनी तिला परत पाठवून दिलं. तसंच गरिबीमुळे या महिलेकडे पैसेही नव्हते. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत असताना या महिलेला मदत करायची सोडून या महिलेला परत पाठवण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्याच्या मारेगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये घडली. दरम्यान, सुदैवानं काही सजग सामाजिक कार्यकर्ते या महिलेच्या मदतीसाठी धावून आल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. अर्चना सोळंके असं या गर्भवती महिलेचं नाव आहे. मंगळवारी ही घटना घडली.
प्रजापत्र | Wednesday, 10/08/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा