Advertisement

सत्तारांच्या 4 अपत्यांचे प्रमाणपत्र रद्द

प्रजापत्र | Monday, 08/08/2022
बातमी शेअर करा

टीईटी घोटाळ्यात आता नवी माहिती समोर आली आहे. माजी मंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दूल सत्तार यांचा मुलगा आणि मुलींचे टीईटी प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता सत्तार यांच्याभोवती नवीन अडचणी वाढल्या आहेत.

 

 

काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रात झालेल्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाला. त्यानंतर परीक्षा विभागाने सात हजार आठशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यात माजी मंत्री अब्दूल सत्तार यांच्या तीन मुली आणि आमेर नावाचा मुलगा अशा चौघांचाही समावेश आहे. हिना सत्तार , उजमा सत्तार, आमेर सत्तार, हुमा फहरीन सत्तार या चार मुलांची प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. सत्तार यांचे सिल्लोड तालुक्यात डीएड महाविद्यालय आहे. टीईडी परीक्षेतून पात्रता मिळवत या महाविद्यालयात मुलांचा समावेश करण्यात येणार होता. या घोटाळ्यात या मुलांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे.

 

 

दोषी आढळल्यास कारवाई करा- अब्दूल सत्तार
''अब्दूल सत्तार म्हणाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमची चूक असेल, मुलांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी पण उगाच बदनाम केले जात असेल तर अशांना फासावर लटकवा. याची मीच चौकशी करण्याची मागणी करीत आहे. कुणीही कुणाला बदनाम करण्याचे काम करु नये. आमच्या संस्थेतून एखादा कागदही गेला असेल तर आम्ही जबाबदार राहू कारवाई व्हावी, पण कुणी उगाच बदनामी करीत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी.''

 

 

माझ्या मुली पात्र नव्हे अपात्र ठरल्या..
माझ्या मुलींनी टीईटी परीक्षा 2019 ला दिली, पण त्या टीईटी परीक्षेत त्या पात्र झाल्या नाहीत. त्या अपात्र झाल्या त्याची प्रमाणपत्र माझ्याकडे आहे, आमच्या मुली पास झाल्या असतील अथवा आम्ही फायदा घेतला असेल तर चौकशी करा.

 

Advertisement

Advertisement