Advertisement

बॉक्सिंगमध्ये भारताला तिसरे सुवर्ण

प्रजापत्र | Sunday, 07/08/2022
बातमी शेअर करा

बर्मिंगहॅम येथे 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 10 व्या दिवसाचे सामने सुरू आहेत. बॉक्सिंगमध्ये भारताने तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताच्या निखत जरीनने 50 किलो वजनी गटात नॉर्दर्न आयलंडच्या कार्ली मॅकनॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताची स्टार बॉक्सर आणि सध्याची विश्वविजेता निखतने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडची बॉक्सर सवाना अल्फियाचा 5-0 असा पराभव केला होता. राष्ट्रकुलमधील निखतचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

 

 

नीतू घंघास (48 किलो) आणि अमित पंघाल (51 किलो) यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत भारताला सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके मिळाली आहेत. भारताच्या अल्डोस पॉलने 17.03 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. भारताच्या अब्दुल्ला अबुबकरने 17.02 मीटरच्या उडीसह रौप्यपदक जिंकले.
 

Advertisement

Advertisement