Advertisement

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षवरील सुनावणी आता उद्या

प्रजापत्र | Wednesday, 03/08/2022
बातमी शेअर करा

दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आता उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी याचिकेची पुनर्लेखन करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता यावर उद्या सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यातून पुरेसा अर्थबोध होत नसल्याचे निरीक्षण सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी नोंदविले आणि याचिकेची पुनर्लेखन करण्याचे निर्देश दिले त्यानुसार आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी राजकीय पक्ष हाच सर्वोच्च असून बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची निर्णय अगोदर सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये अशी भूमिका घेतली, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, कौल , महेश जेठमलानी यांनी पक्षांतर झालेलेच नाही, हा केवळ पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे आणि अपात्रतेची निर्णय पूर्ण बहुमताने निवडलेल्या सभापतीनी घ्यायचा आहे, तो सर्वोच्च न्यायालयाने घेऊ नये अशी भूमिका मांडली . राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हजर झाले.
त्यामुळे आता या याचिकेत उद्या काय होते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Advertisement

Advertisement