अंबाजोगाई - तालुक्यातील वानटाकळी तांडा येथील ३५ वर्षीय महिलेचा पोटात तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आल्याची घटना आज मंगळवारी (दि.०२) सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास घडली. अनिता वैजनाथ राठोड (वय ३५) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. महिलेचा मृतदेह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात आणण्यात आला असून नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.
बातमी शेअर करा