Advertisement

केवळ १९९९ रुपये भरून बुक करता येणार Samsung चे नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स

प्रजापत्र | Sunday, 31/07/2022
बातमी शेअर करा

आगामी गॅलेक्सी स्मार्टफोनसाठी ग्राहक आज म्हणजेच ३१ जुलैपासून प्री-बुक ऑर्डर करू शकतात असे सॅमसंग इंडियाने शनिवारी जाहीर केले. अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला १९९९ रुपये टोकन मनी भरावे लागतील. स्मार्टफोनची ऑर्डर प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर दिली जाणार आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की नेक्स्ट गॅलेक्सी स्मार्टफोन प्री-बुक करणार्‍या ग्राहकांना डिव्हाइसच्या डिलिव्हरीनंतर पाच हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील मिळेल. गॅलेक्सी अनपॅक्डचे १० ऑगस्ट रोजी सॅमसंग न्यूजरूम इंडियावर लाइव्ह-स्ट्रीम केले जाईल. इच्छुक प्रेक्षक कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर याचे स्ट्रीमिंग पाहू शकतात.

या आठवड्याच्या सुरुवातीला, कंपनीने सांगितले होते की १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रमादरम्यान कंपनी पुढील जनरेशांचे मोबाइल सादर करण्यासाठी तयार आहे. या इव्हेंटमध्ये, कंपनी त्यांचे पुढच्या पिढीचे फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फोल्ड ४ (Galaxy Z Fold 4), गॅलेक्सी झेड फ्लिप ४ (Galaxy Z Flip 4), गॅलेक्सी वॉच ५ (Galaxy Watch 5) आणि गॅलेक्सी बड्स २ प्रो (Galaxy Buds 2 Pro) लॉंच करेल.

दरम्यान, गॅलेक्सी झेड फोल्ड ४ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ४ चे रेंडर लीक झाले आहेत. लीकनुसार, गॅलेक्सी झेड फोल्ड ४ बेज, ग्रे-ग्रीन आणि फँटम ब्लॅक रंगांमध्ये येऊ शकतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. त्याच वेळी, गॅलेक्सी झेड फ्लिप ४ मध्ये ड्युअल-रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच, हे ग्रे, लाइट ब्लू आणि पर्पल कलर पर्यायांसह लॉंच केले जाऊ शकते.

एका रिपोर्टनुसार, गॅलेक्सी झेड फोल्ड ४ च्या १२जीबी + २५६जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत १८६३ युरो म्हणजेच सुमारे १ लाख ५१ हजार ८०० रुपये असू शकते, तर १२जीबी + ५१२जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत १९८१ युरो म्हणजेच सुमारे एक लाख ६० हजार रुपये असू शकते. दुसरीकडे, गॅलेक्सी झेड फ्लिप ४ फोनच्या ८जीबी + १२८जीबी व्हेरिएंटची किंमत १०८० युरो म्हणजेच सुमारे ८८ हजार रुपये असू शकते.

Advertisement

Advertisement