Advertisement

अमेरिकेमध्ये प्रथमच आढळला घातक जिवाणू; बर्खोल्डोरिया स्यूडोमलेई

प्रजापत्र | Saturday, 30/07/2022
बातमी शेअर करा

अमेरिकेमध्ये प्रथमच घातक जिवाणू बर्खोल्डोरिया स्यूडोमलेई सापडला आहे. हा जीवाणू दक्षिण मिसिसिपी खोऱ्याच्या किनारपट्टीत आढळला. अमेरिकेच्या रोग नियंत्रक व प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) याबाबत डॉक्टर, आरोग्यसेवक व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

 

पूर्वी हा जिवाणू आशिया व ऑस्ट्रेलियातील काही भागात आढळला होता. बर्खोल्डोरिया स्यूडोमलेई जिवाणू व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करून मेलिओडोसिस आजाराचे कारण ठरतो. 2019 च्या एका संशोधनानुसार, दर 4600 व्यक्तींमागे एकाला हा आजार झाल्याचे निदान झाले. त्यामुळे दर वर्षी सुमारे 90,000 व्यक्तींचा मृत्यू होतो. मेलिओडोसिसमुळे न्यूमोनिया, सेप्टिसीमियाचा धोका वाढतो. बर्खोल्डोरिया स्यूडोमलेई जिवाणू साधारणपणे उष्ण हवामानात आढळतो. हा जिवाणू एकदा आढळल्यानंतर त्याला नष्ट करणे कठीण आहे. बचावासाठी या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची योग्य वेळी ओळख पटवणे आणि त्यावर योग्य उपचार करणे हाच उपाय आहे असे सीडीसीने स्पष्ट केले आहे.

 

 

2020 पासून अस्तित्वात
नमुन्यांच्या तपासणीत हा जिवाणूू मिसिसिपी भागात कमीत कमी 2020 पासून अस्तित्वात असल्याचे दिसले. गल्फ कोस्ट भागात एक जणाला मेलिओडोसिस झाला हाेता तेव्हा जीवाणूचे अस्तित्व उघड झाले. मात्र बर्खोल्डोरिया स्यूडोमलेई केव्हापासून येथे आहे, हे स्पष्ट नाही. पूर्वी हा जिवाणू आशिया, ऑस्ट्रेलियासारख्या उष्ण हवामान असलेल्या परिसरात आढळत होता. द. मिसिसिपीतील हवामान या जिवाणूला अनुकूल आहे.

Advertisement

Advertisement