भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने आज(२४ जुलै) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे.
“माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच..ओम शांती!” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.
बातमी शेअर करा