Advertisement

नवोदयच्या प्रवेश चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

प्रजापत्र | Sunday, 01/11/2020
बातमी शेअर करा

बीड-नवोदय विद्यालयाच्या प्रवेश चाचणी परीक्षांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी २२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज करता येणार आहेत.जिल्ह्यातील पाचवीच्या विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन   प्राचार्य आर. नागभूषणम यांनी केले.१० एप्रिलला ही परीक्षा पार पडणार असून अर्ज करण्यासाठी WWW.navodaya.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहेत.तर अधिक माहितीसाठी आपण या संकेतस्थळाचा navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-Class/ वापर करू शकता.

Advertisement

Advertisement