कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये EDकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. घरात तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. हे सगळे पैसे शिक्षक भरती घोटाळ्यातील असल्याचा संशय इडीलाआहे.
पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीने शोध मोहीम राबवत आहे. त्यानुसार धाडी टाकण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्यातील पैसे असल्याचा ईडीला संशय आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला, तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी रोकडसह पोलिसांनी 20 मोबाईल फोन जप्त केले आहेत.