Advertisement

संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, धाराशिवचे केले उस्मानाबाद

प्रजापत्र | Friday, 22/07/2022
बातमी शेअर करा

काही दिवसांपूर्वी गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे इंग्रजीत दाखवण्यात येत होते. त्यानंतर गुगलने यु टर्न घेतला असून, पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद असे नाव कायम ठेवले आहे. तर धाराशिवचे उस्मानाबाद केले आहे. गुगलने काही दिवसांसाठी हे नाव का बदलले होते, आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

 

राज्यात संत्तातर झाल्यानंतर शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर केले. त्यानूसार, औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले, गुगलने देखील आपल्या मॅपवर या दोन्ही शहरांचे नावे बदलली होती, याला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत गुगलकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आज पुन्हा गुगलने आपल्या मॅपवर गुन्हा औरंगाबाद असे टाकले आहे. गुगलने हे पाऊल नेमके का उचले होते याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
 

Advertisement

Advertisement