Advertisement

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

प्रजापत्र | Friday, 22/07/2022
बातमी शेअर करा

सीबीएसई बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई (CBSE) ने आज, २२ जुलै २०२२ रोजी १२वीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. याशिवाय डिजीलॉकरच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जाऊनही निकाल तपासता येऊ शकतो.

 

 

कोविड-१९ मुळे सीबीएसईने यावेळी दोन टर्ममध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या होत्या. टर्म १च्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये आणि टर्म २च्या परीक्षा एप्रिल ते जून २०२२ मध्ये घेण्यात आल्या. दरम्यान, सीबीएसई टर्म १चा निकाल आधीच शाळांना पाठवण्यात आला आहे.

 

 

यंदाच्या निकालात मुलींनी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात एकूण ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, कामगिरीचा विचार केला तर मुलींनी बाजी मारली आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९४.५४ टक्के मुली आणि ९१.२५ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. या परीक्षेत ३३ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, तर १.३४ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

 

 

बारावीचा निकाल कसा तपासायचा
सर्व प्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर, ‘सीबीएसई १२वी निकाल २०२२ लिंक’ वर क्लिक करा.
लॉगिन पेज उघडेल, येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
आता निकाल तपासा आणि डाउनलोड करा.

 

Advertisement

Advertisement