Advertisement

जायकवाडी 83 टक्के भरले

प्रजापत्र | Thursday, 21/07/2022
बातमी शेअर करा

औरंगाबाद : मराठवाड्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणाची (Jayakwadi Dam) पाणी पातळी आता 83 टक्क्यांवर पोहचली आहे. जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्र आणि उजव्या कालव्यातून 1889 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात येईल. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 90 टक्क्यांवर गेल्यास धरणाचे (Dam) गेट उघडण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. तब्बल 12 दिवसात 32 टक्क्यांवरचा जलसाठा 83 टक्क्यांवर पोहचलायं. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा (Alert) इशारा देत ब्ल्यू लाईन मार्किंगचे निर्देशही देण्यात आलेयंत.

 

 

जलसाठा 90 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर धरणाचे गेट उघडणार
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 82 टक्के झाला होता. सध्या धरणात 1777 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. जलसाठा 90 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर धरणाचे गेट उघडून पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलीयं. नाशिक आणि नगर जिल्हातून जायकवाडीसाठी तब्बल 48,440 क्युसेकने पाणी येत आहे. यामुळेच जायकवाडीचा पाणीसाठा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातंय.

 

 

वरच्या धरणातून आवक सुरूच
आनंदाची बातमी म्हणजे वरच्या धरणातून आवक सुरूच असल्याने जायकवाडीचा दरवाजा उघडला जाणार आहे. जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक तर उजव्या कालव्यातून 300 क्युसेक पाणी सोडले जाईल. आता याचपार्श्वभूमीवर गंगापूर, पैठण या तालुक्यांना नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशारा देऊन ब्लू लाइन मार्किंग करण्याच्या सुचना देखील दिल्यात आहेत.सरासरीपेक्षा 73 मि.मी. जास्तीचा पाऊस जिल्ह्यात जून व महिन्यांच्या जुलैमध्ये  सरासरीच्या तुलनेत 73 मि.मी. पाऊस जास्तीचा झाला आहे.
 

Advertisement

Advertisement