मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा थांबण्याचं नाव घेत नाहीये. ईडीने संजय राऊत यांना आता पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावलं आहे. त्यानुसार राऊत यांना 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (ed enforcement directorate agains summons to shiv sena leader and rajya sabha mp sanjay raut in Patra Chawl land scam)
राऊत यांना मंगळवारी 19 जुलैला ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी आज 20 जुलैला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.
राऊत यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मागितली होती. मात्र ईडीने त्यांना 27 जुलैपर्यंतची मुदती दिली आहे. त्यामुळे आता राऊतांना 27 जुलैला चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. दरम्यान याआधी 1 जुलैला ईडीने राऊतांची जवळपास 10 तास चौकशी केली होती.