Advertisement

राज्यातील 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक

प्रजापत्र | Tuesday, 19/07/2022
बातमी शेअर करा

राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), श्वेता महाले (Shweta Mahale), मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar), देवयानी फरांदे (Devayani Farande) या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कसून चौकशी करत आहेत. 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीनं या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आई आजारी असल्याचं कारण देत या व्यक्तीनं महिला आमदारांकडून पैसे उकळले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. 

 

 

दरम्यान, याप्रकरणी पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमातून हे पैश्यांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

Advertisement

Advertisement