Advertisement

भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी राज्यपालांना उमेदवारी

प्रजापत्र | Saturday, 16/07/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शनिवारी सायंकाळी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.सध्या धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. काही दिवसांपूर्वीच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने आज जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी मतदान ६ ऑगस्टला पार पडणार आहे. तर १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासोबतच, राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे मतदान २२ जुलैला पार पडणार आहे. त्याकरिता सत्ताधारी पक्षाकडून आदिवासी समाजातील महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता आज NDA कडून उपराष्ट्रपती पदासाठी नावाची घोषणा करण्यात आली.

Advertisement

Advertisement