शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाला मजबुत करण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत. ते ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका मेळावे घेणार आहेत. शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून पक्ष बळकट कसा करता येईल, याची पूर्ण खबरदारी आता उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे हे सातत्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. लहान कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यापर्यंत ठाकरे हे मातोश्री आणि सेना भवन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत. अशातच आता येत्या काही दिवसात किंवा महिन्यात उद्धव ठाकरे हे पावसाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे.