भाजपाने माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे, त्यांना आता ४० नवीन भोंगे मिळाले आहेत अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पदाधिकारी, नगरसेवकांची भेट घेतली. उद्या मेळावा होणार आहे तेव्हा पाहतो असा अप्रत्यक्ष इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसंच नाशिकमध्ये जे काही चित्र आहे ते तुम्हाला उद्या दिसेल असंही ते म्हणाले.
“शिवसेना आपल्या जागी आहे. एक दोन लोक पळून गेले असतील, त्यांच्यासोबत शिवसेना गेलेली नाही,” असं संजय राऊत म्हणाले. कृत्रिम पाऊस पाडतात तसं हे कृत्रिम वादळ आहे असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला. पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमाने, जिद्दीने कामाला लागली आहे, ती खूप पुढे गेलेली दिसेल असंही त्यांनी सांगितलं.
बातमी शेअर करा