ब्रिटन-काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आलेल्या राजकीय संकटाप्रमाणेच ब्रिटनमध्येही राजकीय संकट ओढवल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या ३९ आमदांरांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. परिणामी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याचप्रमाणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधील ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी बंडखोरी करत राजीनामा दिला आहे. रिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील पंतप्रधानांची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
21 जुलैपासून संसदेला सुट्टी, तत्पुर्वी मतदानाची तयारी
21 जुलैपासून ब्रिटीश संसदेला सुट्टी लागणार आहे. तत्पुर्वी बंडखोर खासदार आणि नेत्यांना आपल्या बाजूने वातावरण निर्माण करायचे आहे. जेणेकरून पंतप्रधान जॉन्सन यांच्या विरोधात मतदान करता येईल. त्याचवेळी, सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह कार्यकारिणीची बैठक बोलावून नवीन नेत्याची निवड होऊ शकते.