Advertisement

शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीस रात्री वेशांतर करुन बाहेर पडायचे तेव्हा मलाही ओळखू येत नव्हते!

प्रजापत्र | Wednesday, 06/07/2022
बातमी शेअर करा

 

राज्यातील सत्तांतर काही एका रात्रीतून घडले नाही. मागील दीड वर्षांपासून त्याची पटकथा लिहिली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः विधानसभेत याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. "देवेंद्र रात्रीच्या वेळी वेशांतर करुन घराबाहेर पडायचे. ते चष्मा व हुडी घालून जात असत. त्यामुळे बऱ्याचदा मलाही ते ओळखायला येत नव्हते. मी त्यांना 'तुमचे काय सुरू आहे' असे विचारले तर ते कोणतेही उत्तर न देता काढता पाय घ्यायचे," असे अमृता यांनी म्हटले आहे.

 

 

एका खासगी वृत्तवाहिनीशी अमृता फडणवीस यांनी वार्तालाप केला. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतरासोबतच, भाजप परत सत्तेत येण्याची शक्यता वाटत होती असे म्हटले.

Advertisement

Advertisement