Advertisement

पुन्हा एकदा सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

प्रजापत्र | Wednesday, 06/07/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली - पुन्हा एकदा देशात महागाईचा  भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात वाढ केली आहे. 

 

 

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता गृहिणींच्या बजेवट याचा परिणाम होणार आहे. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईतही सिलिंडर 1053 रुपयांवर पोहोचला आहे.

 

 

गेल्या महिन्यात 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत  3.5 रुपयांनी वाढली होती. त्यामुळे एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती. पूर्वी ती 999.50 रुपये होती. सिलिंडर एक हजार रुपायांच्या पार गेल्यानंतर ही थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

 

 

गेल्या महिन्यातील सिलिंडरच्या किमतीतील दोनवेळा वाढ करण्यात आली होती. देशभरातील एलपीजी दर  1,000 रुपयांच्या वर पोहोचले. 22 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी आणि 7 मे रोजी पुन्हा त्याच प्रमाणात वाढ करण्यात आली.
एप्रिल 2021 पासून सिलिंडरच्या किमती 193.5 रुपयांनी वाढल्या आहेत.

 

Advertisement

Advertisement