मुंबई-राज्यपालांकडून राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून, विधानसभा अध्यपदावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव विधानसभा अध्यपदासाठी आघाडीवर आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज संध्याकाळी पाच वाजता बैठक देखील होणार आहे. या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभा अध्यपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तापालट झाले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अशातच दोन्हींकडून म्हणजेच शिंदे गटातून आणि भाजपकडून देखील विधानसभा अध्यपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. राधाकृष्ण पाटील हे ज्येष्ठ नेते असून, ते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे सर्वपक्षीय त्यांचे संबंध चांगले आहेत. त्याचबरोबर विधीमंडळ कामकाजाचा देखील त्यांना चांगला अनूभव असल्याने विखे यांचे नाव आघाडीवर आहे.
पाच वाजता बैठक
विधानसभा अध्यपदासाठी तीन ते चार नाव सध्या चर्चेत आहेत. मात्र, त्यामध्ये विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. आज संध्याकाळपर्यंत एका नावावर शिक्कामोर्तब होणार असून, दुपारी चार वाजता भाजपची महत्वाची बैठक देखील होणार आहे. दरम्यान, भाजपच्या सर्व आमदारांना दुपारी दोन वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. भाजप कार्यालयात आज जल्लोषाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज चार वाजता भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मुंबईतील दादर नायगाव मतदार संघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते.