Advertisement

हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही-उद्धव ठाकरे

प्रजापत्र | Friday, 01/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई-मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी ठाकरे म्हणाले की, "आतापर्यंत मी गेली दोन-अडीच वर्षे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माझ्या जनतेशी बोलत आलो आहे. आज पहिल्यांदा फेस टू फेस बोलत आहोत. नव्या सरकारचं मी पहिल्यांदाच अभिनंदन केलं आहे. दोन-तीन विषय माझ्या मनात आहेत, मी जनतेसमोर मांडू इच्छितो."

उद्धव ठाकरेंनी मांडलेले तीन महत्त्वाचे मुद्दे...
अमित शहांनी मला दिलेला अडीच वर्षांचा शब्द पाळला असता तर हे सर्व सन्मानाने झालं असतं.
आरेचा निर्णय बदलणे चुकीचे, कांजूरमार्गचेच कारशेड राहु द्या. माझ्या पाठीत सुरा खुपसला, तो मुंबईकरांच्या पाठीत खुपसू नका.
लोकप्रतिनिधींना बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे. लोकशाही मूल्ये जपली गेली पाहिजेत. मतदारांना आपलं मत कुठे फिरतंय हेच कळत नाहीये.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही...

आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. अमित शाह आणि माझं जे ठरलं होत ते झालं असते तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. सगळं सन्मानानं झाले असते. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जे भाजपसोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असेही ते म्हणाले. तसेच लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार हवा. लोकशाहीचा घात करु नका, मतदारांच्या मतांचा आदर करा असेही ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, कांजूर मार्गाचा निर्णय कायम राहू द्या. मुंबईकरांच्या वतीनं मी विनंती करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Advertisement

Advertisement