Advertisement

महाराष्ट्रातील राजकीय संकटावर काय म्हणाले शरद पवार ?

प्रजापत्र | Tuesday, 21/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर अखेर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे तीनदा प्रयत्न झाले आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार यातूनही मार्ग काढेल असा मला विश्वास आहे असे शरद पवारांनी म्हटले आहे. 
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात त्यांनी ' या संकटातून देखील काहीतरी मार्ग निघेल , असा मला विश्वास आहे ' असे सांगितले आहे. हा प्रश्न सेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे काय बदल करायचे असतील तर तो त्यांचा निर्णय असेल आणि आम्ही त्यांच्यासोबत असू असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. माझे कोणाशीही बोलणे झालेले नाही आणि कोणी कोणाला भेटावे  त्यावर आम्ही कसे सांगणार असे देखील पवार म्हणाले आहेत. 
दिल्लीत असलेले शरद पवार आज सायंकाळी मुंबईत परतत असून त्यानंतर सायंकाळी त्यांची ठाकरे आणि थोरातांसोबत बैठक होणार आहे. 

Advertisement

Advertisement