मुंबई : शिवसेनेसमोरच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या नेत्यांचा संपर्क झाला असल्याचे समोर येत आहे. त्यांनी चर्चेची 'तयारी ' दाखविली असून यासाठी त्यांनी सेनानेत्यांना सुरत येथे बोलावले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही काळात राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल असे सांगितले जात आहे.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदार सोबत घेऊन सुरत घातल्यानंतर आता शिबावसेनेसमोर राजकीय संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र इतक्यातच एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार का नाही हे सांगता येणार नसल्याचे चित्र असून एकनाथ शिंदे आता चर्चेसाठी तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी सेनेचे काही नेते सुरतला जाणार आहेत.
शिंदे पुन्हा एकदा सेनेने भाजपसोबत जावे अशी आत घालून चर्चा करू शकतात असेही सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय चित्र नेमके कसे असणार हे आज सांगणे अवघड झाले आहे. येत्या काही काळात हे चित्र स्पष्ट होईल.
बातमी शेअर करा