मुंबई-राज्यसभेसाठी आमदारांचे मतदान पुर्ण झाले आहे. सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.
आज निवडणुकीमध्ये मतदानाचा पहिला मान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाला. सर्वात पहिले मतदान भरणे यांनी केले. मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिले मतदान करण्याचा मान मिळणे हा पहिला कौल आमच्या बाजूने लागला आहे. आज दिवसभर महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमदारांना मतदान करता येणार आहे. त्यानंतर मतमोजणी होऊन सांयकाळी 7 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पसंतीक्रम (1, 2, 3, 4, 5 आणि 6) दिला जातो. 42 किंवा अधिक सदस्यांनी उमेदवाराला प्रथम पसंती दिल्यास तो निवडून येतो. विधानसभेतील एकूण 288 सदस्यांपैकी शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले आहे.तर अनिल देशमुख-नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही त्यामुळे निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे आहे पक्षीय बालाबल
आघाडी + - १६७
शिवसेना - ५५
राष्ट्रवादी - ५१ (दोन सदस्य तुरुंगात)
काँग्रेस - ४४
अपक्ष - ९
किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जयस्वाल (रामटेक), संजय शिंदे (करमाळा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), मंजुळा गावित (साक्री), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ).
छोटे पक्ष - ८
समाजवादी पार्टी - २, प्रहार जनशक्ती पार्टी - २, माकप - १, शेकाप - १, स्वाभिमानी पक्ष - १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी - १