मुंबई-महाराष्ट्र बोर्डातर्फे (Maharashtra Board) बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची (HSC Result 2022) वाट पाहत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात आहेत. काही अहवालांमध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, तर काहींमध्ये 10 जूनपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला जातोय. पण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी अधिकृतपणे बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 वीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती दिली.
बातमी शेअर करा