परंडा (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या विकासाच्या धोरणामध्ये सर्वसामान्य जनतेस महागाईच्या झळा बसत असून दररोज गॅस, डिझेल, पेट्रोल, सीएनजी, खाद्यतेल आदी वस्तुचे वाढत असलेल्या किंमती तसेच डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. या वाढलेल्या महागाईच्या विरोधात दि. १५ रोजी परंडा येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारचे महागाई धोरणाविरोधी आंदोलन करण्यात आले आहे.
शहरातील टिपू सुलतान चौक, आठवड बाजार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशालीताई मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे यांच्या उपस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ, पेट्रोल डिझेल, सिएनजी व जीवनावश्यक वस्तु महागाई वाढीच्या धोरणाविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महिला आघाडीच्या वतीने बाजापेठ, दुकानामध्ये सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधुन वाढलेल्या महागाईच्या झळा जाणुन घेतल्या. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असुन मिळालेल्या उत्पादनात दैनंदिन जिवन जगणे मुश्कील झाले आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल यासह सर्व जिवनावश्यक वस्तुच्या किंमती गगनाला भिडत आहेत. यामध्ये केवळ सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे.
यावेळी स्वाती गायकवाड, संजना माने संजना, शुभांगी कातुरे, वैष्णवी बैरागी, दिपाली रगाडे, सुनिता हांडे, सुष्मा शिंदे, रत्नमाला बनसोडे, अनिता राऊत यांच्यासह महिला तसेच माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, ॲड. संदीप पाटील, राहुल बनसोडे, संजय घाडगे, वाजीद दखणी, मलीक सय्यद, बाबुराव काळे, विजय काळे, ॲड. सुहास पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आंदोलन स्थळी दोन चुली मांडून प्रत्यक्षात भाकरी भाजुन वाढलेल्या घरगुती गॅस, गोडेतेल यासह जिवनावश्यक वस्तुच्या वाढलेल्य भाववाढीचा निषेध करण्यात आला. वैशालीताई मोटे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे यांच्यासह महिलांनी भरचौकामध्ये चुली मांडून, भाकरी थापुन, भाजुन महागाई विरोधी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरासह तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.