उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अखेरची मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 4 ते 11 मे दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
सीईटी परीक्षेच्या तारखा पुढे गेल्यानंतर आणि त्या तारखा जाहीर केल्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षाकरिता परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कार्यालयाकडून 4 ते 11 मे दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार नाही
पुढील सीईटी परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे
या संदर्भात तंत्रशिक्षण विभागाकडून एक परीपत्रक काढण्यात आले आहे.
तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक
अभ्यासक्रम - परीक्षेची संभाव्य तारीख
एमएचटी सीईटी
एमबीए / एमएमएस - 23, 24 आणि 25 ऑगस्ट
एमसीए - 4 आणि 5 ऑगस्ट
बी एचएमसीटी - 21 ऑगस्ट
एम एचएमसीटी - 2 ऑगस्ट
एम आर्च - 2 ऑगस्ट
यापूर्वी महाराष्ट्र CET परीक्षा जूनमध्ये होणार होती. परंतु ती आता NEET आणि JEE सारख्या प्रमुख परीक्षांच्या तारखा आणि CET परीक्षेची तारीखा एकत्र येत असल्यानं ऑगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच तारखा जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. अद्याप नव्या तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही.