Advertisement

औरंगाबादेत शांतता हवी-जलील

प्रजापत्र | Friday, 29/04/2022
बातमी शेअर करा

खा.इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंनी सभेपूर्वी इफ्तारला येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. औरंगाबादमध्ये आम्हाला शांतात हवी असून  बंधुभाव टिकवण्यासाठी सभा घेण्यापूर्वी इफ्तारला या असे आवाहन जलील यांनी राज ठाकरे यांना केले आहे.

हिंदुत्व दाखवण्यासाठी मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे, असा टोला जलील यांनी लगावला आहे. भोंगा हा हिंदु आणि मुस्लिम हा मुद्दा नाही. औरंगाबादमध्ये शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे खासदार जलील यांनी म्हटले आहे. आम्ही शिवसेनेविरोधात बोलूू शकतो, मात्र धर्मांच्या नाही असेही त्यांनी म्हटले आहे.देशाची आणि राज्याची संस्कृती आहे की आम्ही सण सोबत साजरे करतो. राज ठाकरेंच्या सभेआधी त्यांनी आमच्यासह रमजानच्या महिन्यात एकत्र येत इफ्तार करावा असे म्हणत राज ठाकरेंना निमंत्रण दिले आहे. आम्हाला शहराची शांतता भंग होऊ द्यायची नाही यासाठी सर्वानी प्रयत्न करू असे ते म्हणाले. 

Advertisement

Advertisement