परळी वै.दि.१७ (वार्ताहर)-तालुक्यातील धारावती तांडा परिसरात वीटभट्टीवर काम करणाऱ्या आपल्या आई सोबत राहणा-या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना आज समोर आली असून नात्यातील व्यक्तीनेच हा गलिच्छ कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत परळी ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळ परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या परंतु कामानिमित्त परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात मोलमजुरी करून गुजराण करून आपल्या मुलीस शिक्षण देत असलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलींवर नात्यातील व्यक्तीनेच असाह्य परिस्थितीचा फायदा घेत अत्याचार केल्याचे गलिच्छ कृत्य केल्याच्या प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात गुरनं ९९/२०२२ कलम ३७६,३७६(२)(फ),३७६(२)(जे) ३७६ (२) (एन) ३२३,३२४,५०४, ५०६ भादवी, कलम ३,४,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.डी. झांबरे हे करीत आहेत.