Advertisement

दहा लाखाची लाच घेताना वैद्यनाथ बँकेचा चेअरमन अशोक जैन एसीबीच्या जाळयात

प्रजापत्र | Monday, 19/10/2020
बातमी शेअर करा

परळीः येथील वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना दहा लाखाची लाच घेताना अटक करण्यात आली. कर्ज मंजुरीसाठी लाच घेताना अटक झालेले अशोक जैन हे कदाचित राज्यातील पहिलेच बँकेचे अध्यक्ष असतील.
लाचखोरीच्या घटनेत आतापर्यंत अधिकारी सापडायचे, मात्र भाजपा खा. प्रितम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षालाच कर्ज मंजुरीसाठी तब्बल दहा लाखाची लाच घेताना पकडण्यात आले आहे. अशोक जैन हे वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष असून एका कर्जदाराला दीड कोटीचे कर्ज मंजुर करण्यासाठी त्यांनी १५ लाखाची लाच मागितली होती. त्यातील दहा लाख रुपये घेताना एसीबीच्या पथकाने जैन यांना पकडले . यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement