Advertisement

भैरवनाथ विद्यालयाला इंडो कंपनीकडून भेट

प्रजापत्र | Saturday, 09/04/2022
बातमी शेअर करा

पुणे-जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाला प्रसिद्ध इंडो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन विद्यालयाला सर्वांगीण सुविधा आणि नवीन इमारतींबाबत आश्वासन दिल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
         सुसंपन्न ज्ञान प्रसारक मंडळ पुण्याचे संस्थापक अध्यक्ष जी.पी.ढाकणे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भैरवनाथ विद्यालयाची स्थापना केली.या विद्यालयात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेला  इंडो नस कंपनीच्या संचालक मॅडम व त्यांचा सर्व इंजीनियरिंग स्टाफ यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शाळेला मूलभूत सुविधा आणि नवीन इमारतीसाठी आपण मदत करू असे आश्वासन दिले आहे.याप्रसंगी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक श्री.भामरे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

 

Advertisement

Advertisement