नवी दिल्ली-केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज सरकारकडून मोठी बातमी मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचवेळी, जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 ची थकबाकी देखील उपलब्ध असेल. नवीन महागाई भत्ता 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के डीए मिळतो. हा 3% ने वाढवून 34% केला आहे. या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
किमान पगारावर DA किती वाढेल?
जर 18,000 रुपयांच्या बेसिक पगारावर एरिअरचे कॅल्क्युलेशन केल्यास तुमच्या पगारात 540 रुपयांची वाढ होईल.सध्या कर्मचाऱ्याला 5,580 रुपये डीए मिळत आहे, जो 31% DA नुसार आहे. आता त्यात 3% अधिक जोडले तर तुम्हाला 6120 रुपये मिळतील. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 540 रुपयांनी वाढ होणार आहे. 2 महिन्यांचे एरिअर सुमारे 1,080 रुपये होईल.
महागाई भत्ता (DA) म्हणजे काय?
महागाई भत्ता हा पगाराचा भाग आहे. ही कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराची निश्चित टक्केवारी असते. देशातील महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. तो वेळोवेळी वाढवला जातो. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळतो.