पुणे : एकामागोमाग एक झालेल्या सिलेंडर स्फोटांनी पुणे हादरलं. पुण्यातल्या कात्रजमधल्या गंधर्व लॉन्सजवळ सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. गोडाऊनमध्ये सिलेंडकरचा साठा करण्यात आला होता. गोडाऊनाला अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा एकामागोमाग एक स्फोट झाला.तब्बल वीस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटांच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनासाठी धाव घेत आग आटोक्यात आणली. यात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे.गोडाऊनला आग नेमकी कशामुळे लागली याचं कराण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्फोटात गोडाऊन आणि आसपासच्या परिसराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
बातमी शेअर करा