अंबाजोगाई-तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे एका आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगरपिंपळा येथील एक आठ वर्षीय चिमुरडी शनिवारी दुपारी ०३:०० च्या दरम्यान घरासमोर खेळत असताना तिच्या शेजारी राहत असलेल्या आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय-२३) याने आपल्या घरात बोलवून बळजबरीने तोंड दाबत बलात्कार केला. दरम्यान पीडितेने हा घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात ३७६, ३७६ (२), ३७६ (ab) ५०४, ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आरोपीला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बातमी शेअर करा