Advertisement

एसटी विलीनीकरणावर मोठा निर्णय?

प्रजापत्र | Wednesday, 02/03/2022
बातमी शेअर करा

मुंबई-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतचा निर्णय आज होण्याची दाट शक्यता आहे. हायकोर्टाच्या निर्देशानंतर सरकारने स्थापन केलेल्या तीन सदस्यीस समितीचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार आहे. या अहवालाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
एसटी विलीनीकरणाबाबत दाखल असलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत हायकोर्टात हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावेळी एसटी विलीनीकरणाबाबतच्या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला नाही. त्यामुळे सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात सांगण्यात आले होते. 

एसटी विलीनीकरणाबाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement